नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकरोडवरील बेळगाव ढगा फाट्यावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रूपाली राजेश आसाम (रा.बेळगाव ढगा) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रूपाली आसाम या गेल्या सोमवारी (दि.१) आपल्या पतीच्या दुचाकीवर त्र्यंबकरोडने डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. बेळगाव ढगा फाटा परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने आसाम दांम्पत्यास धडक दिल्याने रूपाली आजाम जखमी झाल्या होत्या.
पती राजेश आसाम यांनी त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.संजय मानेकर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमदार भड करीत आहेत.