इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंगोली : पैसा मानवाला प्रतिष्ठा देतो, तसेच पैसा माणासाला काहीही करायला लावतो. असाच प्रकार हिंगोलीत घडला. आई-वडिल पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलानेच आपल्या जन्मदात्यांचा आणि भावाचा खून करत अपघाताचा बनाव रचला. आई वडिल आणि भावाचा खून करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
काही दिवसापूर्वी दिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये आईवडीलांसह मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात नसून अपघाताचा बनाव करत मुलानेच आई-वडिल आणि भावाचा खून केल्याची घटना पोलिस तपासात निष्पन्न झाली. महेंद्र जाधव असे या अपराधी मुलाचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी सकाळी दिग्रस वाणी गावाच्या शिवारात दुचाकी रस्त्याच्याकडेला असलेल्या वळणावर पडलेली आढळून आली. कुंडलिक जाधव, आई कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव यांचे मृतदेह त्या ठिकाणी होते. सुरुवातीला ही घटना अपघात असल्यासारखे भासत होते; परंतु अपघात स्थळ पाहता हा अपघात नसल्याचा संशय पोलिसांना होता.
हिंगोली पोलिसांच्या तपासात कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा महेंद्र जाधव याच्याभोवती संशयाची सुई फिरत होती. पोलिसांनी महेंद्र जाधवच्या तपासात खून केल्याची कबुली त्याने दिली. महेंद्रचे आई वडील आणि भाऊ पैसे देत नाहीत, तसेच नातेवाइकांमध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरून बदनामी करत असल्याचा राग महेंद्रच्या मनात होता. क्राईम सिरीयल बघत त्याने स्वतःच्याच आई-वडील आणि भावाचा खून करण्याचा कट रचला. महेंद्रने गोदर भाऊ आकाश,त्यानंतर आई आणि शेवटी वडील कुंडलिक यांना मारले. त्यानंतर गावाजवळ मृतदेह मृतदेह टाकले.









