वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे अनेक जणांना सर्दी, खोकला, ताप इत्यादीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या शरीराला आतून उष्ण ठेवण्याची खूप गरज असते.
यासाठी ड्रायफ्रूट देखील खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीरात उबदार पणा निर्माण व्हावा. तसेच शरीर ऊबदार राहण्यासाठी तीळ आणि गुळ हे सुपर फूड म्हणून काम करतात ,कारण तिळगुळ हे शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी गुणकारी तर आहेतच परंतु त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
तिळामध्ये प्रथिने, फायबर, लोह, तांबे, मॅग्नेशियम इत्यादी विटामिन आढळते तसेच तिळामध्ये सेसमिन आणि सेसमोलिन नावाची दोन महत्त्वाचे संयुगे असतात जे कर्करोगाच्या पेशी वाढवण्यास प्रतिबंध करतात. गुळामध्येही लोह एंटीऑक्सीडेंट आणि फिनोलिक ऍसिड असते ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेडिव्ह स्ट्रेसची पातळी कमी होते.