नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुतीचा लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून रविवारी सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसीमध्ये मेळावा झाला.
यावेळी मित्र पक्ष असलेल्या आरपीआयच्या आठवले गटाने मात्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आमचा वापर कढीपत्ता सारखा करू नका जेवणाच्या मिठा सारखा करावा असे सांगत आपले मत मांडले.
आज नाशिक येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा डेमोक्रॉसी बँक्वेट हॉल, त्रंबक रोड, सातपूर, नाशिक येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, आर.पी.आय.(अ), पी.आर.पी., ब.वी.आ., जे.एस.एस., आर.एस.पी., पी.जे.पी., स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेन, ब.री.एकता मंच, आर.पी.आय.(खरात गट), शिवसंग्राम पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या या मेळाव्यात पालकमंत्री दादाजी भुसे, केंदीय मंत्री भारतीताई पवार, विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप काका बनकर, आमदार सुहास कांदे, आमदार देवयानी फरांदे, नाशिक लोकसभा निरीक्षक जयंत साठे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आर.पी.आय. जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, गणेश उन्हावणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले, प्रास्ताविक लक्ष्मण सावजी यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजन ठाकरे यांनी केले.
या महायुतीच्या मेळाव्यात महायुती नाशिक जिल्हा समन्वयक म्हणून शिवसेना तर्फे अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप काका बनकर, भाजपचे जिल्हा समन्वयक आमदार राहुल ढिकले यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली व महायुतीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी इंडिया आघाडी नाही तर ती घमंडी आघाडी आहे अशी टीका केली. तर आमदार सुहास कांदे यांनी ज्याचा बुथप्रमुख मजबूत असेल त्याची संघटना मजबूत आणि पर्यायाने त्याचा उमेदवार मजबूत असतो असे सांगितले.