येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणामध्ये मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांची विराट सभा उद्या सोमवार दि. ९ रोजी सकाळी ९ वाजता होणार असून सभेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. ठरल्याप्रमाणे सभा वेळेत सुरू होणार आहे. म्हणून ही सभा प्रचंड मोठी व यशस्वी होण्यासाठी सर्वांनी शिस्तीचे पालन करून आदर्श ठेवण्याचे आवाहनही समाजाच्या वतीने तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.
समितीच्या माध्यमातून सभेचे सर्व आयोजन करण्यात आले आहे मंडप, साउंड सिस्टिम, बोर्ड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, फिरते शौचालय, आसन व्यवस्था, या सर्वांची व्यवस्था स्वयंसेवक करणार आहे. तसेच या सभेसाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे या समितीच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
सभेसाठी वाहनांचे पार्किंग नियोजन.
- नाशिक मार्गे येणाऱ्यांसाठी जनता कॉलेज, गौ शाळा मैदान,
- लासलगाव पाटोदा मार्गे येणाऱ्यांसाठी पशू वैद्यकीय दवाखाना, मनमाड मार्गे येणाऱ्यांसाठी संतोषी माता मंदिर शेजारील प्रांगण, अंदरसुल – कोपरगाव मार्गे येणाऱ्यांसाठी स्वामी मुक्तनंद कॉलेज प्रांगण, मोटार सायकल साठी सहारा हॉटेल समोरील प्रांगण,
- वरील प्रमाणे नियोजन असून कोणीही सभा प्रांगणात वाहने आणून गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.