येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावेळी कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही. येवला-लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. नायलॉन वापरावर बंदी आहे तरी काही लोक त्याचा वापर करतात असा टोला भुजबळांनी आपल्या येवल्यातील विरोधकांना लगावला.
यावेळी ते म्हणाले, मी येवल्यात अनेक वेळा पतंग उडवायला आलो आहे. पतंग उडवल्या आहेत, अनेकांचे पतंग कापले आहे. यापुढेही येथेच राहणार आहे. अनेकांचे पतंग कसे कापायचे त्याचे ट्रेनिंग घेतले असल्याचे सांगत भुजबळांनी आपल्या विरोधकांना इशारा यावेळी दिला
बीड येथील सभा आटपून भुजबळ आज येवल्यात आले आणि त्याचे स्वागत पतंगावर असलेल्या फोटो त्यांना मुलांनी दिल्या.