इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आजपासून सुरु होणा-या राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहका-यांना आपल्यासोबत घेत असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. यावेळी त्यांनी असंवैधानिक शिंदे भाजप सरकारचाही शेवटही होणार असल्याचेही सांगितले.
काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबत असंवैधानिक शिंदे भाजप सरकारचाही शेवटही होणार आहे.