मुंबईत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची महापत्रकार परिषद १६ जानेवारी रोजी ४ वाजता वरळीतील डोम सभागृह येथे आयोजित केली असल्याची माहिती ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी दिली. यावेळी कायदेतज्ञ उपस्थितीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राऊत यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुरोगामी न्यायप्रिय महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभा अध्यक्ष महोदयांवर अशी वेळ आली नव्हती! हे का घडत आहे? लोकशाही संविधानाची तिरडी बांधणा-या निकालाची जाहीर चिरफाड: देशात प्रथमच:
जनतेच्या न्यालयात जाहीर पत्रकार परिषद! १६ जानेवारी ४ वाजता :डोम सभागृह वरळी शिवसेना पक्ष प्रमुखश्री उद्धव ठाकरे आणि जनता जनार्दन! खुली चिरफाड! असे म्हटले आहे.