गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

युवा महोत्सवात लोकगीतांनी घडविले लोकसंस्कृतीचे दर्शन

by India Darpan
जानेवारी 13, 2024 | 11:47 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240113 WA0401 1 e1705169807761


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विविध राज्यांच्या कलाकारांनी सादर केलेल्या श्रवणीय लोकगीतांनी महोत्सवात रंगत आणली. या लोकगीतांतून विविध राज्यातील लोकसंस्कृती, परंपरांचे प्रेक्षकांना दर्शन घडविले. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज रावसाहेब थोरात सभागृहात विविध राज्यातील कलाकारांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकगीत कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले.

कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि गोवा‌ राज्यातील कलाकारांनी लोकगीते सादर केली‌. प्रत्येक राज्यातील कलाकारांनी आपल्या पारंपरिक गीते, संगीत, सुरांद्वारे श्रवणीय, नादरम्य लोकगीते सादर केली‌. महादेवाच्या अलौकिक शक्तीचे महत्त्व विशद करणारे कर्नाटकचे लोकगीत, महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकगीते, झारखंडच्या दारूच्या व्यसनावर मार्मिक भाष्य करणारं, लडाखच्या कलाकारांच्या भावस्पर्शी सुरांनी गाव आणि आईच्या प्रेमाची तळमळ‌ व्यक्त करणारे, हरियाणाच्या कलाकारांनी‌ सकस अभिनयासह सादर केले. लोकगीते आणि छत्तीसगढच्या प्राचीन परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या लोकगीतांनी उपस्थितांना अवर्णनीय आनंद दिला.

स्पर्धा स्वरूपात सादर झालेल्या आजच्या सांघिक व वैयक्तिक लोकगीत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून डॉ. रंजना सरकार, डॉ. टी.व्ही. मणिकंदन आणि ओंकार वैरेगकर यांनी काम पाहिले. नेहरू युवा केंद्राचे पंजाब राज्याचे संचालक परमजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक संचालक सूर्यकांत कुमार, धुळे जिल्हा युवा अधिकारी अविनाश आणि रेश्मा चंद्रन यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन‌ केले.

“लोकगीतांचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, तसा तो केवळ संगीताचा उत्सवच राहिला नाही तर भारताच्या लोकसंस्कृती, परंपरा व‌ एकात्मतेचे दर्शन घडविणारा ठरला.” अशी भावना परमजित सिंग यांनी ‌व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्मार्ट गृहिणींसाठी या आहे स्मार्ट किचन टीप्स….

Next Post

हर घर मंदिर हर घर उत्सव हे भजन पंतप्रधान मोदींनी केले सोशल मीडियावर शेअर (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Untitled 94

हर घर मंदिर हर घर उत्सव हे भजन पंतप्रधान मोदींनी केले सोशल मीडियावर शेअर (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011