इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
घर आणि नोकरी सांभाळून आजच्या गृहिणींची अगदी तारेवरची कसरत होऊन जाते आणि त्यात नोकरीवरून आल्या आल्या थकून भागून किचनमध्ये काम करणे तर फारच जिकरीचे ठरते. अशा मध्ये जर काही स्मार्ट किचन टिप्स आपल्याला माहित असल्या तर काम अगदी पटकन होते.
हे आहे ते दहा किचन टीप्स
1) बारीक केलेले मसाले नेहमी मंद आचेवरती शिजवावे त्यामुळे रंग आणि स्वाद टिकून राहतो.
2) भाजी बनवण्यासाठी अधिक वेळ होत असेल तर टोमॅटो टाकल्यानंतर मीठ घाला त्यामुळे कांदा आणि टोमॅटो शिजण्यास मदत होईल.
3) ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी भाजलेले बेसन त्यामध्ये घाला.
4) ग्रेव्ही करताना त्यात पिठीसाखर घाला ,चव चांगली येईल.
5) घरात जर टोमॅटो नसेल तर स्मार्ट टिप्स- ग्रेव्हीमध्ये टोमॅटो सॉस वापरू शकता.
6) खीर बनवताना नेहमी जाड बुडाचे भांडे वापरावे म्हणजे खीर बुडाला लागत नाही.
7) जर मसाल्यात दही घालायचे असेल तर आधी दही नीट फेटून मगच मसाले घालावे.
8) भाजी चिरण्यासाठी नेहमी लाकडी चॉपिंग बोर्डच वापरा, संगमरवरी स्लॅब वर भाजी कापल्याने चाकूची धार कमी होते.
9) घरी तयार केलेली आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट जास्त टिकण्यासाठी त्यात एक चमचा गरम तेल आणि मीठ टाका.
10) जेवण सतत गरम करून खाऊ नका कारण त्यामुळे त्यातील पोषक तत्व कमी होतात.