नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शनिवार १३ जानेवारी २०२४ रोजी समाजातील गरजूंसाठी गुलाबी थंडीत हजारो नाशिक कर धावले व नाशिक रन च्या सामाजिक उपक्रमास हातभार लावला. आज रोजी संपन्न झालेल्या या उपक्रमास संस्थापक विश्वस्त सर्वश्री सौमित्र भट्टाचार्य, चेअरमन रश्मीरंजन भूयान, व्हाइस चेअरमन अशोक पाटील, सचिव अनिल दैठणकर,खजिनदार राजाराम कासार,विश्वस्त रमेश शालींग्राम, मुकुंद भट, प्रबल रे,अविनाश देशपांडे, श्रीकांत चव्हाण, माजी विश्वस्त उत्तम राठोड, बी आर थोन्टेश, सुरेश बी आर, सुधीर येवलेकर तसेच बॉश व टीडीके कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रभू पांडुरंगा , क्रिस्तोफर वोइसनेर, वेंकटेश राघवन,अरविंद नेगी, रमेश जी आर, आणि नाशिक रन करता मोलाचे सहकार्य करणारे सुमित बजाज, आशिष सहा, जॉय अलूर, शशांक बठारिया, दयानंद कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
२००३ साली नाशिक रन या समाजसेवी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. २००३ ते २०२४ ह्या काळात ४०० हुन अधिक गरजू संस्थांना नाशिक रन तर्फे मदत करण्यात आली असून क्रीडा सामाजिक , शैक्षणिक व आरोग्य विषयक तसेच कोरोना काळातील वर्ष वगळता २००३ ते २०२४ हा नाशिकचा समाजसेवेचा प्रवास अविरतपणे चालू आहे.
नाशिक रन हा लोकप्रिय उपक्रम सालाबादप्रमाणे महात्मा नगर क्रीडांगणावर संपन्न झाला. ह्या उपक्रमात जवळजवळ ५००० हुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. सकाळी ७.३० ते ७.५५ या कालावधीत प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. सकाळी ८.०० ते ८.१० या कालावधीत रनचे उद्घाटन व राष्ट्रगीत संपन्न झाले, ८.१० वाजता नाशिक रन च्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा करण्यात आली, ८.१५ ते ८.२० कालावधीत वॉर्म अप, ८.३० ते ८.४० या कालावधीत विशेष मुलांसाठी रन चा शुभारंभ झाला.८.४० ते ८.५५ या कालावधीत लहान मुलांसाठी रन चा शुभारंभ झाला, ८.५५ वाजता प्रौढांसाठी रन ची सुरुवात झाली, ९.३० ते ९.३५ या कालावधीत नृत्य सादरीकरण करण्यात आले, ९.३५ ते ९.५५ या कालावधीत रन मध्ये सहभाग घेतलेल्या उपस्थितांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला लकी ड्रा मध्ये भाग्यवान विजेत्याना प्रथम क्रमांकासाठी एच डी टेक्नॉ सर्विसेस तर्फे १३४०० रुपये किमतीचा मोबाईल, द्वितीय व तृतीय क्रमांका साठी आय बी आय एस हॉटेल तर्फे १०,००० रुपये मूल्याचे एक रात्र व दोन दिवसासाठी निवासासाठी गिफ्ट व्हाउचर, चौथ्या क्रमांकाचे अभय स्टील तर्फे १०००० रुपयाचे गिफ्ट व्हाउचर, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस बॉश पॉवर टूल चे वतीने ९३५० रुपयाचे ड्रिल किट देण्यात आले सहाव्या क्रमांकाचे बक्षीस आय बी आय एस हॉटेल चे वतीने ८००० रुपयाचे आठ व्यक्ती साठी बफे डिनर चे व्हाउचर देण्यात आले,आठव्या क्रमांकाचे बक्षीस एस बी सर्विसेसच्या वतीने ५५०० रुपयाची सायकल देण्यात आली, नवव्या क्रमांकाचे बक्षीस बॉश पॉवर टूल चे वतीने ४१०० रुपयाचे ड्रिल किट तर दहाव्या क्रमांकाचे आय बी आय एस हॉटेल तर्फे ४०००, रुपयाचे बुफे डिनर व्हाउचर देण्यात आले ९.५५ ते १०.०० या कालावधीत चेअरमन रश्मीरंजन यांचे कडून कडून TDK चे अशोक पाटील यांचे कडे TDK कंपनीकडे नाशिक रन चे हस्तांतरण करण्यात आले.अनिल दैठणकर यांनी उपस्थित मान्यवर रन साठी भरभरून प्रतिसाद देणाऱ्या नाशिककरांचे व रन साठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या संस्थांचे , पत्रकार बांधवांचे रन साठी विशेष परिश्रम घेतलेल्या १५० हून अधिक स्वयंसेवकांचे आभार मानले . १० ३० वाजता नाशिक रन समारोप करण्यात आला.
नाशिक रन साठी क्रीडांगण व्यवस्थापन, व्यासपीठ व्यवस्थापन, रन स्टार्टिंग पॉइंट व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा व्यवस्थापन, पेयं जल व्यवस्थापन, वाहन तळ व्यवस्थापन आदींची निर्मिती करण्यात आली असून या विविध समित्या तर्फे नाशिकला सुरळीत व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
नाशिक रन यशस्वीतेसाठी गेल्या पंधरा दिवसापासून कर्नल सागर काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपाद कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, डॉक्टर विनिता जॉर्ज अमोल शिंदे घनश्याम वाबळे सुधीर पाटील , विष्णू गाजरे मयूर रौंदळ सतीश कदम अभिजीत कुलकर्णी वैशाली पवार पुनम देसाई दिव्या पाटील केदार मुजुमदार गोविंद बोरसे यांचेसह व्यवस्थापनासाठी नितीन देशमुख, स्नेहा ओक या व्यवस्थापकीय पदाधिकारीसह समवेत १५० हून अधिक स्वयंसेवक आजच्या नाशिक रन च्या यशस्वितेसाठी कार्यरत होते.