नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ख्यातनाम गझलकार गौरवकुमार उर्फ गणेश आठवले यांचे आज सकाळी अशोका हॅास्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या रविवार (दि.१४) रोजी सकाळी १० वाजता नाशिकरोडच्या दसक गोदावरीतिरी होईल.
गौरवकुमार आठवले हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील लोहारा या गावचे. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून त्यांनी बी.टेक.ही पदवी प्राप्त केल्यानंतर नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ते निरीक्षक (नियंत्रण) या पदावर ते कार्यरत होते.
आपल्या प्रांजळ गझलांनी त्यांनी अनेक संमेलने गाजवली. ‘सवाल’ आणि ‘मांडतो फिर्याद मी’ या त्यांच्या दोन साहित्यकृती रसिकांसह विविध पुरस्कारांच्या मानकरी ठरल्यात. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.