नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या एका मुलासह मुलगी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. दोघांना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याची भिती कुटुंबियांनी व्यक्त केली असून याप्रकरणी अंबड व उपनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना उपनगर परिसरातील श्रमनगर भागात घडली. जमधडे चाळ भागात राहणारा अल्पवयीन मुलगा गुरूवारी सायंकाळ पासून बेपत्ता आहे. त्याला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
दुस-या घटनेत औद्योगीक वसाहतीतील अंबड वजन काटा भागात राहणारी अल्पवयीन मुलगी गुरूवार (दि.११) पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांना वर्तविला असून, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.