इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
मुंबई साऱख्या शहरात एखादी वस्तू हरवल्यास ती भेटणे तसे अवघड आहे. इतक्या मोठ्या शहरात चो-यांचे प्रमाणही तितकेच मोठे. त्यामुळे या शहरात हरवलेली गोष्ट जर सापडली तर त्याचे एक वेगळेच समाधान असते. उत्तर प्रदेश येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांचा मोबाईल असाच हरवला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन तो त्यांना अवघ्या काही तासात मिळवून दिला.
न्यायाधीश छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १ येथे टॅक्सीतून येत असताना त्यांचा मोबाईल टॅक्सीत विसरले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवली. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संपर्क केला व टॅक्सी चालकाने सदर मोबाईल विमानतळ पोलिस ठाण्यात येथे आणून जमा केला.
न्यायाधीशांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने शोध घेत टँक्सी चालकांशी संपर्क केला. त्यानंतर हा मोबाईल मिळाला. या कर्तव्यतत्परतेसाठी न्यायाधीशांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले. इतक्या मोठ्या शहरात हरवलेला मोबाईल मिळाला याचे समाधानही न्यायधीशांना मिळाले. खरं तर मोबाईलच्या किंमतीपेक्षा त्याच्यात असलेले सर्व फोन नंबर व माहिती महत्त्वाची असते.
https://x.com/MumbaiPolice/status/1745744106016661513?s=20