इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताचे प्रसिध्द उद्योगपती महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अटल सेतूचा व्हिडिओ शेअर करत या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा रात्रीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मेहनती, प्रतिभावान अभियंत्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी या सेतुला ‘सोनेरी रिबन’ असे म्हटले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन झाले. एमटीएचएल अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला गेला आहे आणि सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.
नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढवण्याच्या दृष्टीने एक पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्याद्वारे दैनंदिन प्रवास सुरळीत होईल. त्यामुळेच आनंद महिंद्रा यांनी याचे कौतुक केले आहे.