प्रशांत चौधरी, नाशिक
सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असेल. या दिवशी आपण तीन मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उटणे अंगास लावावे, तीळ होम, तीळ तर्पण, तीळ भक्षण, तीळ दान अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग आज आपण करू शकता असे केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो.
शके १९४५ पौष कृष्ण तृतीया रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी उत्तर रात्री २ वाजून ४३ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे विष्टीकरणावर संक्रमण होत असून वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या असून चित्रान भक्षण करीत आहे, ब्राह्मण जाती असून भूषण अर्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त १५ आहेत उत्तरेकडून दक्षिणेक जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व काम विषय सेवन ही कामे करू नयेत,
स्त्रियांनी संक्रांती पर्व काळात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गुळ, तीळ ,सोने, भूमी ,गाय, वस्त्र, घोडा, इत्यादी यत्ताशक्ति दान करावे
टीप -दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविला जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. माहिती संकलन दाते पंचांग द्वारे