सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूरकरांच्यावतीने साजरा करण्यात येणारा एक गाव एक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या सातपूर अध्यक्षपदासाठी २५ तर कार्याध्यक्षपदासाठी ६ इच्छुकांची नावे समितीकडे आली आहे. येत्या दोन दिवसात सर्वानूमते अध्यक्ष व कार्यध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यंदा साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी सौभाग्य लॉन्स येथे समितीची बैठक संपन्न झाली. व्यासपीठावर २०१८ ते २०२० पर्यंतचे अध्यक्ष व कार्याध्यक्षांसह आ. सीमा हिरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यमान अध्यक्ष सचिन गांगुर्डे तर कार्याध्यक्ष वृषाली सोनवणे यांच्या गेल्या वर्षभरातील कार्याचे कौतुक करण्यात आले. गांगुर्डे व सोनवणे यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच नवरात्रउत्सव सुरु करण्यात आला. यापुढेही तो अविरत सुरू ठेवावा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.
दरम्यान, सन २०२३ मधील सोहळ्याप्रसंगी आलेल्या जमा खर्चाचा हिशोब खजिनदार मुन्ना तुपे व जीवन रायते यांनी मांडला. यावेळी अध्यक्षपदासाठी २५ तर कार्याध्यक्षपदासाठी ६ इच्छुकांनी आपली नावे समितीकडे दिली आहे. यावेळी माजी अध्यक्ष नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, गंगाराम सावळे, किशोर निकम, संजय राऊत, सचिन गांगुर्डे, इंदुबाई नागरे, गीता जाधव, वृषाली सोनवणे आदिसह करण गायकर, अमोल पाटील, धीरज शेळके,संजय जाधव, हिरामण रोकडे, हेमंत शिरसाठ, रवी देवरे, राजेश खताळे आदीसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थतीत होते .