मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुण्याशी कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध…केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांनी उलगडून सांगितला इतिहास

by Gautam Sancheti
जानेवारी 12, 2024 | 7:34 pm
in संमिश्र वार्ता
0
Civil4ZGU5 e1705068267369

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याशी कौटुंबिक आणि हृदयाचा संबंध आहे. महाराष्ट्रातील मुख्य शहर म्हणून पुण्याला नागरी विमान वाहतुक सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व प्रगती हे आमचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांनी आज पुण्यात केले.
पुण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचा उद्घाटनपूर्व आढावा घेण्यासाठी ते पुणे विमानतळावर आले होते. यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी सिंधीया बोलत होते.

आपले मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, पुणे हे आमचे मुख्य शहर आहे, ऐतिहासिक, संस्कृतीचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे सम्राज्याची राजधानी, माझ्या कुटुंबाचे प्रमुख महादाजी शिंदे यांचे देखील हे पुणे आहे. या शहराचा विकास आणि नागरी विमान वाहतुकीमधील याची प्रगती पंतप्रधानांचा संकल्प आणि आदेश याने विकास तसेच प्रगतीच्या संस्कृतीची सुरुवात झाली आहे. पुण्याची क्षमता मोठी आहे. माहिती आणि तंत्रज्ञान, शिक्षण, निर्मिती या सर्वाचे देशपातळीवरील केंद्र पुणे आहे. पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांची एकच विचारधारा आहे की पुण्याला नागरी विमान वाहतुकीमध्ये अग्रस्थानी आणायचे आहे. त्याच विचारांचा परिपाक म्हणजे हे नवीन टर्मिनल आहे. याची तयारी आता पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

५२ हजार स्क्वेअर मीटर जागेत हे विमानतळ उभे राहिले आहे. भविष्यातील गरजेच्या दुप्पट क्षमतेचे हे टर्मिनल आहे. २०१४ मध्ये देशातील १७ शहरांसोबत पुणे विमानतळ जोडले गेले होते व गेल्या ९ वर्षात ते ३७ शहरांशी जोडले गेले आहे. सोबत सिंगापूर व दुबई या आंतरराष्ट्रीय थेट विमानसेवा देखील सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
माझी अशी धारणा आहे की विमानतळ हे काच आणि सिमेंटची रचना नाही तर शहरात येणाऱ्या प्रवश्यासाठी शहराचा अनुभव करण्यासाठी प्रथम द्वार आहे. विमानतळाच्या यातील आणि बाहेरील बाजूस त्या शहराचा, क्षेत्राचा आणि राज्याचा इतिहास-संस्कृती प्रतिबिंबीत होणे अनिवार्य आहे. देशामध्ये वेगवेगळी आणि अलौकिक संस्कृती आहे; यासर्वाचे प्रदर्शन विमानतळांवर व्हावे, असे वाटते, असे मत ज्योतीरादित्य यांनी व्यक्त केले.

पुण्याच्या या विमानतळावर देखील बाहेरच्या बाजूला शनिवार वाड्याच्या धर्तीवर रचना उभारण्यात आली आहे. दीपमाळ देखील इथे तुम्हाला दिसेल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा देखील येथे नतमस्तक होण्यासाठी आहे, जो प्रेरणा देण्याचे काम करील. याशिवाय महाराष्ट्रातील विविधतेचे चित्र इथल्या भिंतींवर दिसेल. हे विमानतळ म्हणजे महाराष्ट्राचा जीवंत आत्मा आहे. पंतप्रधान आणि आमची हीच कल्पना होती, अशी भावना त्यांनी मांडली. आज मी यासर्वाचे परीक्षण करून काही सूचना केल्या आहेत आणि लवकरच या वास्तूचे उद्घाटन होऊन लोकार्पण होईल, अशी माहिती ज्योतीरादित्य सिंधीया यांनी यावेळी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील या शहराची वाटचाल एव्हिएशन हबच्या दिशेने…केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं केला दावा

Next Post

शिवजन्मोत्सव समिती सातपूर अध्यक्षपदासाठी २५ तर कार्याध्यक्षपदासाठी ६ जण इच्छुक…..दोन दिवसात होणार निवड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 6
मुख्य बातमी

अखेर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा…हिंसाचारानंतर निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण चार निर्णय

सप्टेंबर 9, 2025
IMG.02
संमिश्र वार्ता

रावेरचे शरद पवार गटाचे माजी आमदार यांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

सप्टेंबर 9, 2025
Screenshot 20250909 123855 WhatsApp
संमिश्र वार्ता

राहुड घाटात गॅस टँकरचा अपघात होऊन गॅस गळती सुरु…वाहतुकीची कोंडी

सप्टेंबर 9, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
संमिश्र वार्ता

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू…आज या संघा दरम्यान सामना

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मी पुराव्याशिवाय बोलत नाही, पण, हे खरं आहे काय? रोहित पवार यांचे मंत्री बावनकुळे यांना प्रश्न

सप्टेंबर 9, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
Next Post
IMG 20240112 WA0453 1 e1705070472213

शिवजन्मोत्सव समिती सातपूर अध्यक्षपदासाठी २५ तर कार्याध्यक्षपदासाठी ६ जण इच्छुक…..दोन दिवसात होणार निवड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011