इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -विश्वचषकाचा भारताचा पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २०० धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतीय गोलंदाजासमोर चांगली दमझाक झाली. सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चाचपडत खेळत होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने घेतला. पण, त्यांना त्यात फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
या सामन्यात भारतीय गोलंदाजाने १९९ देत ऑस्ट्रेलिया संघाला ऑलआऊट केले. सर्वच गोलंदाजींनी आज चांगली कामगिरी केली.चेन्नईच्या मैदानावर ही पहिली लढत रंगली आहे. आज हे दोन्ही संघ विश्वचषकाचे दावेदार असल्यामुळे या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा या विश्वचषकाची सुरुवात बलाढ्य संघाबरोबर होणार आहे. यात भारताने जर हा सामना जिंकला तर त्यांचा प्रचंड आत्मविश्वास वाढले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही यजमान भारताचा पराभव करत विजयाने सुरुवात करण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. त्यामुळे पहिलाच सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी आज पाऊस पडला नाही. गेल्या आठवडाभरापासून चेन्नईमध्ये पाऊस सुरुच आहे. शनिवारी सुध्दा अनेक भागात जोरदार पाऊस पडला. स्टेडियमच्या अवतीभोवती ढगाळ वातावरण आहे. पण, हवामान विभागाने रविवारी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरला. हा सामना दुपारी २ वाजता सुरु झाला. या पहिल्याच सामन्यात शुबमन गिल याला डेंग्युची लागण झाल्यामुळे भारताला थोडं टेन्शन आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाचा संघ
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, एडम जम्पा.