इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी प्रतिबंधित बब्बर खालसा आतंरराष्ट्रीय संघटना आणि बिश्नोई गुन्हेगारी नेटवर्कच्या ठिकाणांवर छापे टाकून अनेक बेकायदेशीर शस्त्रे, दारुगोळा आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. या दोन प्रतिबंधित गुन्हेगारी संघटनांच्या पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतल्या एकूण ३२ ठिकाणी या धाडी मारण्यात आल्या.
सकाळपासून सुरु झालेल्या या मोहिमेत २ पिस्तुल, मॅगेझिन आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यावेळी काही आक्षेपार्ह कागदपत्रं आणि डिजीटल यंत्रसामुग्रीही जप्त करण्यात आली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेला या आंतरराष्ट्रीय टोळीकडून या राज्यात अनेक बेकायदेशीर कारवायांची माहिती मिळाल्यानंतर या धाडी मारण्यात आल्या. त्यांच्यावर सुपारी घेऊन खून करणे, खंडणी उकळणे त्याचप्रमाणे दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करणे यासारखे आरोप आहेत.