मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली ही माहिती

by Gautam Sancheti
जानेवारी 11, 2024 | 10:18 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20240111 WA0376 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे उ‌द्घाटन गुरुवार १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. महोत्सवाच्या उद्घाटनाआधी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा रोड शो होईल. राष्ट्रीय युवा महोत्सवाची सुरुवात १२ जानेवारीला तपोवन मैदानावर होईल. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सचिव मीता राजीव लोचन, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.मंत्री श्री. ठाकूर म्हणाले की, १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता युवा कला महोत्सव सुरु होईल. भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी चमकदार आहे. खेळाडू आपली कामगिरी उंचावत विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावत आहेत. त्यामुळे २०२६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत प्रबळ दावेदारी करणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

  • १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता खाद्य महोत्सव, महा युवा ग्राम हनुमान नगर येथे सुरु होईल.
  • १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र युवा प्रदर्शन महा युवा ग्राम येथे सुरू होईल.
  • १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, १३ ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता समूह आणि सोलो लोकनृत्य प्रदर्शन, महाकवी कालिदास कलामंदिर येथे होईल.
  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजता फोटोग्राफी स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिर हॉल नं. १ येथे होईल.
  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर हॉल क्रमांक दोनमध्ये उ‌द्घाटन आणि सादरीकरण होईल.
  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये गट आणि सोलो लोकगीत प्रदर्शने होईल.
  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील उदोजी महाराज संग्रहालयात युवा कला शिबिर, पोस्टर मेकिंग आणि कथा लेखन होईल.
  • १३ ते १४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.१५ वाजता प्रेरणादायक (सुविचार) कार्यक्रम होईल.
  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता साहसिक कार्यक्रम अंजनेरी, बोट क्लब, चामार लेणी आणि महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.
  • १३ ते १५ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजता स्वदेशी खेळ महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.
  • १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १.१५ वाजता युवा संमेलन महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.
    राष्ट्रीय युवा महोत्सव १६ जानेवारीला विभागीय क्रीडा संग्रहालयात एका सोहळ्यात समारोप होईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कार्यक्रम स्थळांची केली पाहणी

Next Post

आज प्रधानमंत्री राज्यातल्या ३० हजार कोटीच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Narendra Modi e1666893701426

आज प्रधानमंत्री राज्यातल्या ३० हजार कोटीच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011