इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांची ४ कोटी ५६ कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
१९३० सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई . पोलीस सह आयुक्त (गुन्हे) व अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त डॉ. डी.एस.स्वामी, पोउनि. रुपाली कुलथे, पोउनि. मंगेश भोर, व सायबर पथक यांनी तात्काळ कारवाई करत ४८ तासाचे आत फसवणूक झालेल्या रकमेतील ३ कोटी ८० लाख रुपये विविध बँक खात्यांवर गोठवण्यात यश मिळविले.
या घटनेनंतर पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन करतांना सांगितले की, सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ जवळचे पोलीस ठाणे किंवा १९३० सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. जेणेकरून लवकरात लवकर संपर्क केल्यामुळे कारवाई करण्यास व फसवणूक झालेली रक्कम गोठवण्यात मदत होईल.