नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश राजधर महाले (रा.इंडियन टुल्स सोसा.सिध्द हनुमान मंदिराजवळ,अशोकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महाले कुटूंबिय गेल्या रविवारी (दि.७) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख १६ हजार २५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.