नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पानस्टॉल चालकाकडे खंडणी मागणा-या तरूणांना जाब विचारणे एकास चांगलेच महागात पडले आहे. चार जणांच्या टोळक्याने दगडफेक करीत २४ वर्षीय युवकावर धारदार चाकूने हल्ला केला. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित पगारे, विकी उर्फ अक्षय झावरे, आकाश पगारे व मुन्ना कासार अशी युवकावर चाकू हल्ला करणा-या संशयितांची नावे असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत युवकाने तक्रार दाखल केली आहे. .
येथे तुला दुकान चालवायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल अशी दुकानदारास धमकी देत परिसरात दहशत माजविली. संतप्त टोळक्याने त्यांना शिवीगाळ करीत चाकू हल्ला केला.