नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा येथील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनाही आपल्या कलेच्या माध्यमातून कांद्यावर श्रीराम मंदीराची प्रतिकृती तसेच वनवासातील जात असलेले श्रीराम, सिता माई, लक्ष्मण यांचे चित्र रेखाटत आपल्या भावना आगळ्या वेगळ्या पध्दतीने व्यक्त केल्या आहे.
शुक्रवारी नाशिकच्या पवित्र भूमीत देशाचे पंतप्रधान येत असून त्यांना कांदा उत्पादकांच्या भावना पोहचल्या हव्या अशी भावना त्यांनी यातून व्यक्त केली.
येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीराम मंदीराचे लोकार्पण होत असून या सोहळ्यासाठी अनेक कलाकार आपापल्या माध्यमातून कला सादर करीत आहे. तशीच काहीशी वेगळी कला सटाणा येथील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी केली असून त्यांनी कांद्याचा वापर त्यात केला आहे.