हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधारामुळे रत्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने आई-वडीलांना घेऊन जाणा-या मुलाच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात तीघेही जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आकाश जाधव हे दुचाकी चालवत होते. ते आई वडीलांना दवाखान्यात घेऊन जातांना हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात कोसळून त्यांच्यासह आईवडीलांचाही मृत्यू झाला. डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये हा अपघात झाला.
रात्री हा अपघात झाला असला तरी आज सकाळी तो समोर आला. बुधवारी रात्री हा अपघात होऊनही तो कुणाच्याही लक्षात आला नाही. तिघांना त्यामुळे मदत मिळू शकली नाही. या रस्त्यावर फारशी रहदारी नसते. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबच संपले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
आकाश कुंडलिक जाधव, त्यांची आई कलावती आणि वडील कुंडलिक अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. आकाश हे बुधवारी सायंकाळी आईवडीलांना दुचाकीवर घेऊन रुग्णालयात जात होते. अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला.