नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी नाशिक दौरा असून या दौ-याच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुवारी नाशिक दौ-यावर येत आहे. ते दुपारी १.१५ वाजता ठाणे येथील रेमंड हेलिपॅड येथून हेलिकॅाप्टरने नाशिक पोलिस परेड ग्राऊंडवर २ वाजता येणार आहे. त्यानंतर ते पाहणी करुन पुन्हा दुपारी ३ वाजता पोलिस परेड ग्राऊंडवरुन मुंबईकडे रवाना होणार आहे.
अवघ्या एक तासाचा हा दौरा असून त्यात ते तयारीची पाहणी करणार असल्याचे बोलले जात आहे. याअगोदर सोमवारी मुख्यमंत्री रत्नागिरी विमातळावरुन शासकीय विमानाने नाशिक आले होते. त्यावेळेस त्यांनी तपोवन मैदानाची पाहणी करुन पूर्वतयारी व आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी ते पुन्हा नाशिकला येत आहे.