इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेचाही पेपर फुटला.. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? असा प्रश्न शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केला आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी मुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत असून त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं पेपरफुटी वर कडक कायदा करा अशी मागणी युवकांनी आणखी किती वेळा करायची? युवकांना SERIOUS होण्याचा सल्ला देत असताना आपल्या जबाबदारीबाबत आपण SERIOUS होणार की नाही? असे प्रश्नही केले आहे.
रोहित पवार यांनी याअगोदरही पेपरफुटीचे प्रश्न उपस्थितीत केले आहे. पण, त्यांनी पेपरफुटीच्या प्रश्नांवर आता सत्ताधा-यांना अनेक प्रश्न करत टीका केली आहे.