इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्राचा महानिकाल चक्क इंग्रजीत ? कोणी ड्राफ्ट केलं? सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी ? नक्कीच कोणीतरी सुप्रीम कोर्टाचे वकील असतील. ह्यांनी फक्त वाचण्याचे काम केले. इंग्रजीत का वाचलं? कारण त्याचे मराठीत भाषांतर येत नसावे. विधान सभा अध्यक्षांना त्यातले धड शब्द पण वाचता येत नव्हते असे थेट ट्विट करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थितीत केले आहे.
या पोस्टनंतर त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया सुरु झाल्या आहे. त्यात एकाने निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेले ७५ वर्ष इंग्लिशमध्येच कामकाज होतं. तुम्ही इतक्या PIL केल्या आहेत, एक तरी मराठीत केली आहे का? असा प्रश्न केला आहे. तर एकाने का नार्वेकर शेंगदाणे खाऊन वकील झालेत का असे विचारले आहे. तर एका पोस्टमध्ये बाप रे केव्हढं हे ज्ञान अंजली ताई….!!! चक्क तुषार मेहता…
काही जणांनी अंजली दमानियाच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहे. अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले की हेच होतं.तुम्ही आंदोलन करा मी येतो तुमच्यासोबत नाही सहन होत ताई आता हे सर्व काही. तर एकाने काय तर म्हणे राज्यात मराठी बोलणे आणि पाटी लावणे आवश्यक आहे.
हजर असलेल्या ८० टक्के आमदारांना इंग्रजी कळत नसेल. किती जणांना कळाला असेल निकाल. एकाने तर मॅडम काही दिवसांपूर्वी मी शालेय व क्रीडा विभाग तसेच युवा व क्रीडा संचनालाय बालेवाडी ऑफिस कडून माहितीच्या अधिकारात काही माहिती मागविली होती. ती चक्क इंग्रजीत मिळाली !! अशी प्रतिक्रिया दिली आहे.