इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
येवला शहर आणि परीसरात सकाळ पासूनच दाट धुक्याची चादर पसरल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना दिव्यांच्या प्रकाशातच मार्गक्रम करावा लागला. नाशिक जिल्हयाच्या ग्रामिण भागात रोज वातावरणात बदल पहावयास मिळत असून आज येवल्यात ते दिसले.
या धुक्यामुळे मात्र बळीराजा चांगलाच धास्तावला असून याचा थेट परिणाम कांद्यावर होणार असून त्यामुळे कांद्या सह गहू, हरभरा या पिकांवर रोग पडण्याची शक्यता आहे. दाट धुक्याचा मात्र येवलेकरांनी सुखद अनुभव घेतला.
या धुक्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यात वाहन चालकांना गाडी चालवतांना अडचणी येत आहे.