नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सुमारे ३१ किलोमीटर लांबीचा नाशिक रोड ते द्वारका तसेच पुढे सीबीएस, गंगापूर रोड, सातपूर अशा विविध ठिकाणी पोहोचणारा टायरयुक्त निओ मेट्रो प्रकल्प जाहीर होऊन दोन ते तीन वर्षे लोटली. परंतु, आजतागायात त्याला मूर्त स्वरूप आणले गेले नाही असा प्रश्न आरोग्य चिंतन फाउंडेशनचे चेअरमन आणि नाशिक येथील आयुर्वेदिक चिकित्सक वैद्य विजय कुलकर्णी यांनी केला आहे.
त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खरे तर नाशिक शहरातील वाहनांची वाढणारी प्रचंड संख्या लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने देखील ते हानिकारक असून त्याचा नाशिककरांच्या आरोग्यावर देखील दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. द्वारका परिसर नाशिक रोड ते द्वारका हा रस्ता तसेच द्वारकाच्या पुढे शालीमार सीबीएस असे प्रचंड रहदारीचे रस्ते न्यू मेट्रोच्या उपक्रमाची सुरुवात झाल्यावर पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने ही सुरुवात उपयुक्त ठरू शकेल. तेव्हा सर्वच लोकप्रतिनिधींनी न्यू मेट्रो प्रकल्पाची सुरुवात लवकरात लवकर करून घेण्याची व्यवस्था करावी.
पत्रकात वैद्य कुलकर्णी यांनी पुढे असे नमूद केले आहे की न्यू मेट्रोला मंजुरी मिळाल्याचे देखील वृत्त पूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा नेमके घोडे कुठे आणले आहे हे सर्वच नागरिकांना समजायला हवे आणि लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर या नियम मेट्रोचा आग्रह धरून पुणे नागपूर या शहरांप्रमाणेच नाशिकचे मेट्रोच्या नकाशावर लवकरात लवकर नाव आणावे अशी मागणी वैद्य कुलकर्णी यांनी पत्रकात केली आहे