मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल मान्य नाही. नार्वेकरांनी आरोपींची भेट घेतली तेव्हाच निकाल कळाल्याचा आरोप करत उध्दव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाने सुमोटो कारवाई करावी अशी मागणी केली. शिवसेना कुणाची हे ठरवणारे नार्वेकर कोण असेही त्यांनी सांगितले. हा निकाल देतांना पायाचा चुकला आहे. शिवसेना कुणाची ही लहान मुलाला देखील कळतं नार्वेकरांनी लोकशाहीचा खून केला आहे. निर्लज्जपणाचा कळस गाठला. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निकालावर बोलतांना त्यांनी सांगितले की, नार्वेकरांनी पक्षांतरांचा राजमार्ग दाखवून दिला. आमची घटना अवैध तर आमचे आमदार पात्र कसे आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला. यावेळी ते म्हणाले की शिवसेना कधीच संपणार नाही. जनतेला हा निकाल मान्य नाही. हा निकाल देतांना नको त्यात ते घुसले व वेळकाढूपणा काढला असेही ते म्हणाले..
नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर अगोदर निकाल देत त्यात शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यावेळी त्यांनी भरत गोगावलेंचा व्हिप हा वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर गोगावले यांच्या ठाकरे गटाच्या विरोधात असलेल्या याचिकेचा निकाल देतांना मात्र ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवले.