मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या निकालावर टीका केली. ते म्हणाले की, अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले. या निकालानंतर ठाकरे यांना न्यायालयात जावे लागेल. त्यांना सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेल. हा न्यायालयीन निवाडा नाही तर हा राजकीय निवाडा आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी व्हिप देण्याचा अधिकार पक्ष संघटनेचा असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना कुणाची हा निकाल अध्यक्षांनी केल्यामुळे ठाकरे गटाची बाजू अजून सर्वोच्च न्यायालयात भक्कम होणार आहे. सत्ताधारीने या निकालाबाबत आधाची माहित होते. त्यांनी त्यामुळे आधीच भाष्य केले होते असेही त्यांनी सांगितले.
नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर अगोदर निकाल देत त्यात शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यावेळी त्यांनी भरत गोगावलेंचा व्हिप हा वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर गोगावले यांच्या ठाकरे गटाच्या विरोधात असलेल्या याचिकेचा निकाल देतांना मात्र ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवले.