मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपचं हे षडयंत्र आहे. पण, शिवसेना संपणार नाही. यातून शिवसेना उभी राहील. अध्यक्षांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सींग असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, निवडणुका घ्या खरी शिवसेना कळेल. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग चोरांचा सरदार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोण एकनाथ शिंदे त्याची लायकी काय असेही सांगितले. विधानसभा अध्यक्ष आहे कोण ? हा निकाल त्यांनी दिला नाही तर तो दिल्लीत लिहून आल्याचेही त्यांनी सांगितले.
नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर अगोदर निकाल देत त्यात शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यावेळी त्यांनी भरत गोगावलेंचा व्हिप हा वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर गोगावले यांच्या ठाकरे गटाच्या विरोधात असलेल्या याचिकेचा निकाल देतांना मात्र ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवले.