मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात खळबळउडवून देणाऱ्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज ऐतिहासिक निकालाचे वाचन करत आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण ३४ याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली होती. सुमारे २०० पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश वाचला जाईल आणि नंतर संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना पाठवली जाणार आहे. पहा निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण !