नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३ ते ९ जानेवारी दरम्यान तालकटोरा येथील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलाव येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडे हिने राज्याचे प्रतिनिधित्व करताना चार सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई केली आहे.तर ओवी सहाणे हिने कास्य पदक मिळविले
आदिती हिने १४ वर्ष मुलींच्या गटात २०० आणि ४०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बटर फ्लाय, आणि ४.१०० फ्री स्टाईल रीलेमध्ये एकुण चार सुवर्ण पदक व ४.१००मीटर मिडले रिले प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले आहे. आदितीने १०० मीटर बटर फ्लाय प्रकारात १:०६:१५ मिनिट वेळ नोंदवून नविन राष्ट्रीय विक्रम केला आहे. नाशिकची दुसरी जलतरण पटू ओवी सहाने हिने २०० मीटर फ्री स्टाईल या प्रकारात कास्य पदक प्राप्त केले आहे. तर ओमकार ढेरींगे, मयांक धामणे, आत्मजा सहाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
हे सर्व जलतरणपटू नाशिक मनपाच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक रोड येथे प्रशिक्षक शंकर मादगुंडी , विकास भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळ सायंकाळ सराव करते .अदितीच्या यशामागे तरुण तलाव व्यवस्थापक माया जगताप स्वीमर फाउंडेशनचे पदाधिकारी आणि मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.