गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सोनी मराठी वर नवी मालिका ‘निवेदिता, माझी ताई!’…या तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला

by India Darpan
जानेवारी 10, 2024 | 5:04 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240110 WA0232 2 e1704886454933

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालिका आणि प्रेक्षक यांचं अतूट नातं विणणारी लोकप्रिय वाहिनी म्हणजे सोनी मराठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या दिमाखात सोनी मराठीने आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे . आशय आणि विषय यांनी समृद्ध असणा-या मालिकांची परंपरा जपणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवर नात्यांची सुरेख गुंफण बांधलेली नेहमीच पाहायला मिळते . अशाच एका गोड नात्याची मजेशीर गोष्ट लवकरच सोनी मराठीवर येणार आहे. एका अशा नात्याची गोष्ट जी घराघरांत घडते .. एक असं नातं ज्यामुळे प्रत्येक घराला घरपण लाभतं .. असं एक निरपेक्ष नातं जे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतं … ते नातं म्हणजे … बहीण आणि भाऊ यांचं अतूट नातं . आजवर संपूर्ण मालिका बहीण आणि भाऊ यांच्या अनोख्या प्रेमावर क्वचितच आली असेल आणि नेमकी हीच बाब हेरत, सोनी मराठी प्रथमच ‘निवेदिता, माझी ताई!’ ही सुंदर मलिका वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १५ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येते आहे.

छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ… या कवितेच्या ओळी आठवल्या की मनात आपल्या बालपणीच्या आठवणी हमखास दाटून येतात. रिमोटवरून भांडणारी.. एकमेकांची गुपिते आई-बाबांपासून कधी लपवणारी तर कधी त्याच गुपितांच्या जोरावर ब्लॅकमेल करणारी.. एकमेकांना छळणं हा आपला जन्मसिद्ध हक्क मानणारी अशी भावंडं प्रत्येकाच्या हृदयातला एक मोठा कप्पा व्यापतात. कितीही भांडली तरीही बहीण-भावाचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असंच काहीसं असतं. मात्र दशमी क्रिएशन्स प्रस्तुत ‘निवेदिता, माझी ताई!’ ही मालिका थोडी वेगळी आहे. बहीण-भावाच्या नात्याची ही गंमत लवकरच उलगडणार असून तत्पूर्वी मालिकेचे मजेशीर प्रोमोज सध्या सोनी मराठीवर पाहायला मिळत आहेत. त्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मालिका सुरू होण्याआधीच मिळाली आहे.

‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये मोठ्या बहिणीच्या भूमिकेत एतशा संझगिरी आणि तिच्या लहान भावाच्या भूमिकेत रुद्रांश चोंडेकर यांची अप्रतिम केमिस्ट्री रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यात काही शंका नाही. या मालिकेमध्ये अशोक फळदेसाई एका डॅशिंग तरुणाच्या भूमिकेत म्हणजेच यशोधनच्या भूमिकेत दिसणार आहे. यशोधन आणि निवेदिता यांची मॅजिकल लव्हस्टोरी ही या मालिकेचा टर्निंग पॉइंट असणार आहे. निवेदिता, असीम आणि यशोधन या तिघांच्या प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट ‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. असीमची लाडकी ताई आणि यशोधनची स्वप्नपरी या दोघांच्या निर्व्याज प्रेमात निवेदिताला तारेवरचीच कसरत करावी लागणार हे नक्की. कधी प्रेमाने तर कधी लबाडीने आपल्या निवेदिता ताईला कायम आपल्याजवळ ठेवू पाहणारा असीम आणि निवेदितासोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहणारा यशोधन यांची गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

Next Post

या जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडेला चार सुवर्ण तर ओवी सहाणे हिला कास्य पदक

India Darpan

Next Post
IMG 20240110 WA0228 2 e1704886844723

या जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडेला चार सुवर्ण तर ओवी सहाणे हिला कास्य पदक

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011