इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आर्थिक दृष्ट्या मागासलेले, गरीब, आदिवासी, ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फायदा व्हावा, या स्तरांमधील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन देशाच्या विकासासाठी उपयोगात आणावे या हेतूने केंद्र सरकारने जवाहर नवोदित विद्यालय या संकल्पने अंतर्गत देशभरात विविध राज्यांमध्ये अशा प्रकारच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन आज उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र काही शाळांमध्ये गैरप्रकार देखील घडल्याचे उघड झाले आहे. या शाळा शहरा ऐवजी ग्रामीण दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी नेमके काय घडते, याची शासन व प्रशासन तसेच शिक्षण विभागाला कल्पनाच नसते, त्यामुळे येथे काय गोंधळ होतो हे कळत नाही. असाच गैरप्रकार पालघर जिल्ह्यात घडला असून आता हे प्रकरण उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांनी हावीच्या ३५ विद्यार्थ्यांवर रँगिग.केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर तालुक्यातील माहीम ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात घडला. यात अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करण्यात आली. यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडद्याला इजा झाली.
रात्रीच्या वेळी अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना रात्री बाहेर बोलावले. काही सूचना द्यायच्यात असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थी बाहेर आले. यावेळी जे विद्यार्थी विद्यालयात उशिरा आले त्यांनी उभे रहायला सांगितले. त्यानंतर प्रत्येकास बोलवत त्यांच्या गालावर जोरजोरात मारण्यात आले. शर्ट इन नसतात, तुम्ही बुट घालत नाहीत, मेसमध्ये आवाज असतो, तुम्ही जेवायला वेळेवर येत नाहीत, ही कारणे सांगण्यात आली.
अशी शिक्षा व मारहाण झाल्यानंतर दहावीचे विद्यार्थी देखील संतापले. त्यानंतर त्यांच्या अगोदर थोडी बाचाबाची झाली नंतर चांगलीच हाणामारी झाली. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना पुन्हा १ वाजता या मुलांना बोलावले व झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगायचे नाही असा दम भरला. पण, हॉस्पिटलमधून विद्यार्थी विद्यालयात आल्यावर त्याची तक्रार प्राचार्यांकडे केली. त्यावेळी झालेल्या प्रकार चुकीचा असून आम्ही ११ वीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्राचार्यांनी म्हटले. आता परीक्षा असल्यामुळे परीक्षेची तयारी करा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.