दीपक ओढेकर, नाशिक
आज दुर्दैवाने नाशिकच्या मृण्मयी साळगावकर आणि इतर तिघींसह भारताचे रोइंगमधील कॉक्सलेस फोर या प्रकारातील पदक त्या पाचव्या आल्यामुळे गेले. नाशिकला रोइंगचा फार मोठा आणि जुना इतिहास नाही तरीही नाशिकची एक मुलगी जिद्दीने भारतातर्फे आशियाई स्पर्धेसारख्या अव्वल स्पर्धेत निवडली जाते आणि अंतिम फेरीतही पोहोचते ही अतिशय अभिमानाची आणि स्पृहणीय गोष्ट आहे. मृण्मयीला पदकविजेती होण्याची उद्या पुन्हा एकदा संधी आहे आणि तिला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देउ या…
भारताचा कॉक्स्ड एट ( coxed 8 + ) हा महिला संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. थायलंड , जपान, चीन आणि व्हियेतनाम यांच्यासह तो भारतीय वेळेनुसार सकाळी ८:५० वा आपले कसब दाखविण्यासाठी आणि आज हुकलेले पदक उद्या खेचून आणण्यासाठी सिद्ध झाला आहे.
मृण्मयीसह इतर सात सहरोइंगपटू आहेत एस स्वेन, गीतांजली,रितू कालिंदी, सोनाली, पीडी थांगजॅम, पीबी अवस्थी, टी देवी आणि पी बाबू .
भारतीय संघ पाचव्या लेन मध्ये असेल.
उपांत्य फेरित भारताने २००० मीचे स्पर्धात्मक अंतर ६:४१:३७ वेळेत पूर्ण करुन पाचवा क्रमांक मिळविल्याने भारतीय संघ अंतिम फेरीत पात्र ठरला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. उद्या भारतीय संघाने पदक जिंकले तर रोइंगमध्ये आशियाई पदक जिंकणारा पहिला भारतीय महिला संघ ठरेल.