इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली व चिन्हही दिले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी मेरीटवर आमच्या बाजूने निकाल द्यालया हवा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, निकाल लागल्यानंतर मी त्यावर अधिकृत बोलेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, विरोधक मॅच फिक्सींगचा आरोप करत आहे. नार्वेकर यांची भेट लपूनछपून भेट झालेली नाही. ते कामसाठी आले होते. ते अध्यक्ष आहे व आमदारही आहे. त्यामुळे त्यांची भेट झाली असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, हे आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणतात तेच घटनाबाह्य लोक आहेत. ठाकरे गटच घटनाबाह्य आहे. त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. ते अक्कलेचे तारे तोडत आहे. त्यामुळे ते आरोप करत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.