इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या परिषदेत आपल्या भाषणात लिंगभेदावर वक्तव्य केल्यानंतर ते वादात सापडले आहे. या वक्तव्यानंतर तृतीयपंथी अधिकार कार्यकर्त्यांनी सुनक यांच्यावर टीका केली तर दुसरीकडे सनक यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थन केले.
या भाषणात सुनक यांनी भाषणात पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्री असते. हा कॉमन सेन्स आहे असे म्हटले होते. विशेष म्हणजे या भाषणा दरम्यान त्यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही मंचावर उपस्थित होत्या. सुनक यांनी केलेल्या य़ा भाषणांचे सर्वांनी कौतुक केले. १९९७ नंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या कोणत्याही नेत्यापैकी सर्वोत्तम भाषण असल्याचे यावेळी सांगितले गेले.
सुनक यांनी लोकांनी त्यांना पाहिजे असलेलं कोणतेही लिंग असू शकते, यापेक्षा इतर लिंग (पुरुष आणि महिला या शिवाय इतर) असू शकते यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला धमकावू नये. पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्री असते. हा कॉमन सेन्स आहे. असे म्हटले होते. त्यामुळे या भाषणानंतर LGBTQ समुदायाकडून कडाडून विरोध करण्यात आला.