इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पण, काही गोष्टी मजेशीर असतात. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेची ठरली असून त्यात मुलगी व वडीलांचा व्हॅाटअॅपवरील संवाद आहे. या संवादात वडिलांनी थेट मुलींच्या एका मेसेज वरुन थेट इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे वाभाडे काढले आहे.
या वडिल व मुलीचा संवाद चार ओळींचा असला तरी तो बोलका असाच आहे. यात वडील मुलीला मेसेज पाठवता की ४० हजार तुझ्या अकांऊटमध्ये डिपॅाजीट केले. चेक कर… त्यावर मुलगी रिप्लाय देतांना म्हणते येस…नंतर फाऊंड म्हणते. त्यावर वडील संतापात व म्हणता रिसीव्हड त्यानंतर ते म्हणातात मी इंग्लिश मीडियम मे पैसा बरबाद किया मेरा…
खरं तर फाऊंड हा शब्द वापरण्या एेवजी तो रिसीव्हड वापरायला हवा होता. पण, मुलीच्या या चुकीमुळे वडीलांना हे काँमेंटस केले आहे. त्यानंतर मुलीने तो ट्विट करत या संवादाचा स्क्रिन शॅाट सोशल मीडियावर टाकला आहे. त्यावर नेटक-यांनी सुध्दा बरेच कॅामेंट केले आहे. खरं तर हा छोटासा विषय असला तरी तो बोलका आहे. त्यामुळे ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.