इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आज लागणार असून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची गुप्त भेट झाल्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली. निकालानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही बैठक घेतल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या निकालापूर्वीच नार्वेकर आजारी पडल्याने विरोधकांनी टीका केली होती. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा राजकीय भूकंपाचा भाग आहे, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा या निकालाची चर्चा सुरु झाली आहे.
हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने आला तर शिंदे सरकार कोसळेल जर शिंदे गटाच्या बाजूने आला तर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. एकुणच या निकालाने जोरदार राजकीय घडामोडी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वाचे लक्ष आहे.