इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाण्यात येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपा-शिवसेनेचा जाहीरनामा आला होता. त्यात त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न पुन्हा उपस्थितीत केला आहे.
ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोलप्रश्नावरून बेमुदत उपोषण केल्यानंतर चौथ्या दिवशी राज ठाकरे यांनी ठाण्यात गेले. या ठिकाणी अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले यावेळी त्यांनी उपोषण करणे हे आपले काम नाही, असे मत व्यक्त केले.
त्यानंतर या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही काही प्रश्न विचारले. यावेळी ते म्हणाले हे सगळे टोल म्हैसकर यांच्याकडे आहेत, हे कोण आहेत म्हैसकर? माझी माहिती चुकत नसेल तर, एकनाथ शिंदे यांनी पिटिशन केलं होतं. त्यांनी ते मागे घेतलं? का मागे घेतलं? कोणी मागे घ्यायला लावलं? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मला लोकांचे पण नवल वाटतं? टोल भरायचा आनंद येतो का त्यांना? यावेळी त्याांनी मुख्यमंत्र्यांसमोर मी या सगळ्या गोष्टींसंदर्भात भेट घेईल. निवडणुका तोंडावर आहेत, लोकांचा राग त्यांना पण परवडणारा नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.