नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेने स्टार्ट-अप आणि इतर संस्थांच्या सहभागाद्वारे नवोन्मेषाच्या क्षेत्रात एक महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने १३ जुन २०२२ रोजी “स्टार्टअप्स फॉर रेल्वेज” हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पुढील भारतीय रेल्वे इनोव्हेशन पोर्टल सुरु करण्यात आले: https://innovation.indianrailways.gov.in/.
भारतीय रेल्वेची परिचालन कार्यक्षमता आणि सुरक्षा सुधारण्यासाठी, भारतीय स्टार्टअप्स/एमएसएमई/नवोन्मेषी/उद्योजकांनी विकसित केलेल्या नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. भारतीय रेल्वेची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि देखभाल क्षमतेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. या धोरणांतर्गत, स्टार्टअप/एमएसएमई/नवोन्मेषी/उद्योजकांकडे प्रकल्पात तयार केलेल्या बौद्धिक संपदा अधिकारांचा (IPR) वापर करण्याचा विशेष हक्क असेल. या उपक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या २३ प्रकल्पांचे अंदाजे मूल्य रु. ४३.८७ कोटी इतके आहे.
इनोव्हेशन पोर्टलवर नोंदणी केलेल्या एकूण संस्था- १२५१
स्टार्टअप्स- २४८
वैयक्तिक नवोन्मेषी- ६७१
सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग (एमएसएमई)-१४२
संशोधन आणि विकास संस्था/संस्था-५८
मालकी/भागीदारी फर्म/कंपनी/एलएलपी/जेव्ही/कन्सोर्टियम-४७
बिगर सरकारी संस्था (एनजीओ)-१९
इतर-६६