इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा वारंवार उपस्थित होत असल्याने त्यांनी आता निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या सदस्यत्त्वाची मुदत संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, की अडीच वर्षांनंतर माझी खासदारकीची मुदत संपत आहे. त्यानंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत असेपर्यंत काम करत राहणार आहे. मी १९६७ पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही याबाबत कधी टीका केली नाही, असे सांगताना कुटुंबातूनच होणाऱ्या टीकेवर पवार यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. त्यांचा रोख अप्रत्यक्षरीत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होता.
देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असे म्हणतात, याकडे लक्ष वेधता पवार म्हणाले, की याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ‘ईडी’ करीत असलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले, की केंद्रातील सरकार जोपर्यंत बदलत नाहीत, तोपर्यंत छापे पडत राहतील