पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी २०२२-२३ साठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) आणि महिला क्रीडा मार्गदर्शकासाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
या पुरस्कारांसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in/sports_web या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.