इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी आज ईडीने तर खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असतांना ठाकरे गटाच्या दोन लोकप्रतिनिधींवर हे छापे टाकण्यात आल्यामुळे राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे.
वायकर यांच्या मुंबईतल्या जोगेश्वरी येथील घरासह एकूण ७ ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. तर राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे सुरु आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांना विविध प्रकरणात कारवाई करण्याचे सत्र सुरु झाले. त्यात आता उध्दव ठाकरे यांच्या या दोन शिलेदारावर छापे टाकण्यात आले.