नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी नाशिक विमातळावर भेट घेतली. यावेळी विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली. सोमवारी ओझर विमानतळावर झालेल्या या भेटीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतला.
या बैठकीत लवकरच महावितरण, जिल्हा परिषद, महापालिका आणि संबंधित खात्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपकेंद्रांचे विविध विषय मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. त्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी १५ दिवसात या संदर्भातली बैठक घेण्याचे नियोजन करु असे सांगितले.
विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या विकासासाठी वीज पुरवठा, पाण्याची पाईपलाईन, रस्ता आदी गरजा आहेत. उद्योग समूहांकडून सामाजिक दायित्व निधी मिळवून बांधकाम आणि इतर कामांसाठी मदत करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. या चर्चेच्या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, आमदार दिलीप बनकर, अजय बोरस्ते आदींसह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेले निवेदन