इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः देशभर अयोध्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तयार आहे. प्रभू रामाच्या प्रतिष्ठापनेसाठी प्रत्येकाला हातभार लावायचा आहे. अमरोहातील एक मुस्लिम कुटुंबदेखील त्यात सहभागी आहे. श्रीराम नावाच्या ४० हजार टोप्या हे कुटुंब तयार करत आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी रामभक्त या टोप्या घालतील.
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील मुस्लिम कारागीर वसीम बेग आणि त्यांच्या कुटुंबीयांना उद्घाटनाच्या दिवशी परिधान करण्यासाठी ‘जय श्री राम’ लिहिलेल्या टोप्यांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. नसीम बाग यांनी सांगितले, की त्यांना दिल्लीतून भगवान श्रीरामाचे चित्र आणि नाव असलेल्या ४० हजार टोप्या पाठवण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्या अयोध्येला जाणार आहेत. अचानक एवढी मोठी ऑर्डर मिळाल्याने बेग आणि त्यांच्या कुटुंबीयांचे चेहरे उजळले आहेत. बेग यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह टोप्या बनवून होतो.
अमरोहा हे शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे आहे. अमरोहा येथील रहिवासी वसीम बेग आणि त्यांचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून हिंदू सणांना टोप्या बनवण्याचे काम करत आहेत. बेग यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह टोप्या बनवून होतो. या कामातूनच त्यांच्या घरातील चूल पेटते. आता बेग यांना राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी श्रीरामाच्या नावाने टोप्या बनवण्याचे काम मिळाल्याने स्वत:चा अभिमान वाटत आहे.
बेग म्हणाले, की ही खूप आनंदाची बाब आहे. बेग आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी टोप्या बनवण्याची ऑर्डर मिळाल्यापासून त्यांच्या कुटुंबीयांना आनंद आहे. यातून हिंदू-मुस्लिम ऐक्य तर प्रस्थापित होतेच; शिवाय आमच्या कुटुंबाला मोठा रोजगारही मिळतो.